लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची कामगिरी खराब झाली. केवळ रायगडची जागा ते जिंकू शकले. दुसरीकडे शरद पवारांकडे सहानभूती जाऊन पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ खासदार निवडून आले. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा बारामतीमधून झालेला पराभव हा दादांना सर्वात मोठा धक्का होता.
दुधानं तोंड पोळल्यामुळे आता विधानसभेला दादा ताकही फुंकून पित आहेत. बदलत्या राजकीय परीस्थितीमुळे अजित पवार शिरूरमधून लढण्याची शक्यताय. मित्रपक्ष भाजपही दादांच्या मदतीला धाऊन आलाय. भाजपकडील मतदारसंघ असूनही भाजपनं इथं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याच नाहीत. शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक पवार आहेत. शरद पवारांनी अशोक पवारांना मंत्री करण्याचं आश्वासन दिलंय.
अजित पवार यांनी शिरुरची निवड केली तर अजित पवार विरुद्ध अशोक पवार, असा सामना रंगणार हे निश्चित आहे. अजित पवारांनी जाहीर भाषणात अशोक पवारांवर निशाणा साधताना मंत्री दूरची गोष्ट आहे, तू आमदार कसा होतो तेच पाहतो, असं आव्हान दिलंय. शिरुरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न बाळगून आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार 1991 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून 2019 पर्यंत सलगपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमधील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे 2024 ची विधानसभा दादांसाठी सोपी नाही एव्हढं मात्र निश्चित.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.