Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यातील एसी, टाकी चोरली; भाजपच्या आरोपांनी राजकारण पेटलं

BJP On Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यादव यांनी सरकारी बंगला रिकामी करताना एसीसह अनेक वस्तू चोरल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यातील एसी, टाकी चोरली; भाजपच्या आरोपांनी राजकारण पेटलं
Tejashwi YadavSaam Tv
Published On

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) सरकारी निवासस्थानातून टाकी, एसी आणि इतर वस्तू चोरल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे बिहारचे राजकीय तापमान चांगलंच तापलं आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी पाटणा येथील 5, देशरत्न मार्ग येथील बंगला रिकामा केला होता.

आता हा बंगला उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना देण्यात आलाअसून ते आगामी विजयादशमीला घरात प्रवेश करणार आहेत. भाजपचा आरोप आहे की, जेव्हा सम्राट यांची टीम बंगल्यात पोहोचली तेव्हा तिथे भांडी, एसी, सोफा यांसारख्या अनेक वस्तू गायब होत्या.

तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यातील एसी, टाकी चोरली; भाजपच्या आरोपांनी राजकारण पेटलं
Haryana CM Face: काँग्रेस जिंकली तर हरियाणाचा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' दोन नावे आघडीवर

तसेच वॉश बेसिन आणि नळही उखडले होते. 2017 मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करताना उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर भाजपने असेच आरोप केले होते.

एका वृत्तानुसार, भाजपचे मीडिया प्रभारी दानिश इक्बाल यांनी सोमवारी आरोप केला की 5, देशरत्न मार्ग येथील सरकारी निवासस्थान रिकामे करताना तेजस्वी यादव यांनी एसी, खुर्ची, टॅप इत्यादी अनेक गोष्टी उखडून घेऊन गेले. जसे अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केले होते. तसेच तेजस्वी यांनी इथं केलं, असं ते म्हणाले. जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनीही तेजस्वी यांच्यावर निशाणा साधत सरकारी मालमत्ता घेणे ही कसली राजकीय संस्कृती आहे, असं म्हटलं आहे.

तेजस्वी यादव यांनी सरकारी बंगल्यातील एसी, टाकी चोरली; भाजपच्या आरोपांनी राजकारण पेटलं
Eknath Shinde News : अमित शहांनी दिलेलं टार्गेट 2026 आधीच पूर्ण करू; CM शिंदेंचा नक्षलवादावर भाष्य करताना शब्द!

दरम्यान, आरजेडीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असताना त्यांना हा बंगला मिळाला होता, असे आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी हा बांगला रिकामा केला आहे. भाजप तेजस्वी यांना घाबरते, म्हणूनच ते असं खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com