Thane Police On New Year Celebration Saam tv
मुंबई/पुणे

Thane Police: तळीरामांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी, नव वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

Thane Police On New Year Celebration:

Satish Kengar

>> हिरा ढाकणे

Thane Police On New Year Celebration:

नवीन वर्ष 2024 उजाडायला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता ठाणे पोलीसही सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करताना 31 डिसेंबरला अनेक तळीराम हे शहरांमध्ये हैदोस घालताना पाहायला मिळतात.

यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची देखील चिन्ह असतात. याअनुषंगाने ठाणे वाहतूक शाखा आता न्यू इयर सेलिब्रेशन दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पावलं उचलताना पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी बार चालकांसोबत आज बैठक घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केलं. 31 डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत बार सुरू असल्याने अती मद्यधुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी, असे आवाहन वाहतूक पोलीस उपयुक्त यांनी केले.  (Latest Marathi News)

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचा देखील वाहतूक पोलीस उपायुक्त त्यांनी सांगितले.

तर एखादा ग्राहक अति मध्य सेवन केलेला असेल तर त्या ग्राहकाला घरी सोडण्यात यावं, वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचप्रमाणे बेकायदेशीर पार्किंग मुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं बार मालकांनी सांगितलं आहे.

याबाबत माहिती देताना ठाणे शाखा वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकरांशी संवाद साधताना सांगितलं की, ''आज ठाणे शहर परिसरात जे बार चालवतात त्यांना सांगण्यात आलं आहे की, कोनत्याही त्यांचा ग्राहक मद्यधुंद होऊन गाडी चालवणार असेल, त्यांनी त्याला थांबवावं. तसेच त्याला घरी सोडण्यासाठी ड्रायव्हरची किंवा टॅक्सीची व्यवस्था करावी.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT