Varandha Ghat, Raigad News saam tv
मुंबई/पुणे

Raigad News : पावसाचा जाेर वाढला... वरंध घाटात 'या' वाहनांना 30 सप्टेंबरपर्यंत बंदी

Varandha Ghat : या नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन पाेलिस प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad News : रायगड (raigad) आणि पुणे (pune) जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट आजपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत रायगड जिल्हा वाहतुक शाखेने आदेश काढला आहे. अतीवृष्टी दरम्यान घाटात दरड कोसळण्याची भिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra News)

वरंध घाट हा म्हाप्रळ पंढरपुर राज्यमार्गाचा भाग असून पुणे आणि रायगडमधील व्यापारी दृष्ट्या या मार्गाचे महत्व आहे. पुणे जिल्ह्यातुन भाजी, दुध दुभते, धान्य आणि स्टेशनरीच्या व्यापारी मालाची मोठ्या प्रमाणात वाहतुक या मार्गाने होत असते.

या घाटातील वेडीवाकड्या आणि अरुंद वळणांवर मोठी वाहने अडकतात आणि वाहतुक कोंडी निर्माण होते. त्याच प्रमाणे अतीवृष्टी दरम्यान घाटात दरड कोसळण्याची भिती लक्षात घेऊन आजपासून (एक जूलै) 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान अवजड वाहन बंद केल्याने व्यापारावर परीणाम होईल अशी भावना या परिसरातील व्यापारी वर्गाची आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT