navi mumbai, eknath shinde, balasaheb thackeray, balasahebanchi shivsena saam tv
मुंबई/पुणे

Balasahebanchi Shivsena : आवाज काेणाचा.., बाळासाहेबांच्या शिवसेनेचा; पहिल्या शाखेचे उदघाटन दणक्यात (पहा व्हिडिओ)

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची नवी मुंबई कार्यकारणी जाहीर.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Balasahebanchi Shivsena : निवडणुक आयाेगाच्या (ECI) निर्णयानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा दाेन गटात शिवसेना विभागली गेली आहे. दाेन्ही गटाकडून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येत आहे. दाेन्ही गट एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं बाळासाहेबांची शिवसेना या त्यांच्या सेनेची पहिली शाखा नवी मुंबईत येथे उघडली. (Breaking Marathi News)

बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena Branch In Navi Mumbai) हे नाव मिळाल्यानंतर पहिली शाखा नवी मुंबईत (Navi Mumbai) उघडल्यानंतर या शाखेची कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची नवी मुंबईची कार्यकारणी जाहीर झाली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी विजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बराेबरच संपर्क प्रमुखपदी किशोर पाटकर यांची उपजिल्हाध्यक्षपदी सुरेश कुलकर्णी तसेच शिवराम पाटील यांच्यासह सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं शाखा स्थापनेत आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

SCROLL FOR NEXT