Lata Mangeshkar passes away: लता दीदींच्या अडचणीत पाठीशी राहायचे बाळासाहेब ठाकरे Saam Tv
मुंबई/पुणे

Lata Mangeshkar passes away: लता दीदींच्या अडचणीत पाठीशी राहायचे बाळासाहेब ठाकरे

भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना आधी कोरोना आणि नंतर न्युमोनियाची लागण झाली होती. (Balasaheb Thackeray used support Lata Didi her difficulties)

हे देखील पहा-

लता दीदी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचे नाते सर्वश्रृत होते. लतादीदींनी बाळासाहेबांना मोठा भाऊ मानत असत. तर, बाळासाहेब देखील लता दीदींच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांच्याबरोबर उभे असायचे. लता मंगेशकरांसाठी बाळ ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे होते. ठाकरे प्रत्येक कठीण प्रसंगी लतादीदींच्या पाठीशी उभे राहत असत. बाळासाहेब ठाकरे यांचे चित्रपटविश्वात अनेक अभिनेत्यांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध होते. तरी लतादीदींना सर्वोच्च स्थान दिले होते.

बाळ ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा लतादीदींना आपल्या वडिलांची सावली परत एकदा डोक्यावरुन उठल्याची भावना व्यक्त केली होती. बाळासाहेब ठाकरेंचे चित्रपट जगातील दिग्गज कलाकारांशी त्यांचे खास नाते निर्माण झाले होते. पण, लता मंगेशकर यांच्याविषयी विशेष आदर होता. त्यांचा लता मंगेशकरांवर इतका विश्वास होता की, मृत्यूअगोदर त्यांनी लता दीदींना भेटायला बोलावले होते आणि माझे अखेरचे काही दिवस राहिल्याची भावना दीदींसमोर त्यांनी व्यक्त केली होती. बाळासाहेबांनी लता मंगेशकर यांचा नेहमीच आदर केला आहे. ते त्यांना देशाचा तसेच मराठी समाजाचा अभिमान मानत असायचे.

लता दीदींच्या मनात बाळासाहेबांविषयी खूप आदर होता. बाळासाहेबांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त लता मंगेशकर त्यांना नेहमी त्यांचे स्मरण करत असत. वर्षातून कधी जाणे येणे शक्य झाले नाही तर आवर्जून लतादीदी आणि बाळासाहेब एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांच्या घरी येत-जात असत. बाळासाहेब ज्यावेळेस कलानगर या ठिकाणी त्यांच्या जुन्या घरी राहत होते… त्यावेळेस हृदयनाथ, लतादीदी, आशाताई, उषाताई, मीनाताई असे सारे मंगेशकर बंधू-भगिनी बाळासाहेबांच्या बंगल्यावर गेले होते… त्यावेळेस त्या भेटीचा आनंद दोन्ही कुटुंबांच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर झळकत होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT