Lata Mangeshkar passes away: लता दिदींचा आवाज अजरामर - राहुल गांधी

भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे.
Lata Mangeshkar passes away: लता दिदींचा आवाज अजरामर - राहुल गांधी
Lata Mangeshkar passes away: लता दिदींचा आवाज अजरामर - राहुल गांधीSaam Tv

मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Lata Didi voice is immortal Rahul Gandhi)

हे देखील पहा-

लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांचा आवाज अनेक दशकांपासून लोकप्रिय आहे. त्यांचा आवाज नेहमी अजरामर राहणार आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना, असा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी एक सूर्य, एक चंद्र, एक लता, मंगेशकर.....युग संपले. असा उल्लेख करत लता दीदी यांच्या प्रकृतीविषयी बातमी दिली आहे. संजय राऊत यांनी ३ ट्विट करत लता दीदींच्या श्रद्धांजली वाहिली आहे.

Lata Mangeshkar passes away: लता दिदींचा आवाज अजरामर - राहुल गांधी
Lata Mangeshkar passes away: एक सूर्य..एक चंद्र..एकच लता..लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींची भेट घेतली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी एक सूर्य, एक चंद्र, एक लता, मंगेशकर.....युग संपले. असा उल्लेख करुन लता दीदी यांच्या निधनाविषयी बातमी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com