balasaheb thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Balasaheb Thackeray Jayanti 2024: बाळासाहेब ठाकरे असंख्य लोकांच्या हृदयात...PM मोदी ते शरद पवारांसह दिग्गजांकडून अभिवादन!

Balasaheb Thackeray Jayanti: मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा बुलंद आवाज म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होय. ते नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत रहायचे. आज त्यांची जयंती साजरी होतेय. यानिमित्ताने त्यांना PM नरेंद्र मोदी ते शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Political Leaders Tribut To Balasaheb Thackeray

आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलंय. तसंच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना अभिवादन केलंय. (Marathi Latest News)

पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलंय. ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे ते आजही असंख्य लोकांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या आदर्शांप्रती अखंड समर्पण, गरीब आणि दलितांसाठी असणारी वचनबद्धता यामुळे ते जिवंत आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार यांनी वाहिली आदरांजली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या X या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर त्यांना आंदरांजली वाहिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या X या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, अशी पोस्ट त्यांनी केलीय.

उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनीही X या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!, अशी पोस्ट करत त्यांना अभिवादन केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना आंदरांजली वाहिली आहे. त्यांनीही X या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आदरांजली वाहिली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT