Manasvi Choudhary
शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखले जायचे.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी १९६६ साली शिवसेना संघटनेची स्थापना केली.
बाळासाहेब ठाकरे हे धुरंधर राजकारणी, उत्तम व्यंगचित्रकार होते.
वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून त्यांना व्यंगचित्राचे धडे मिळाले.
राजकारणातील परखड वक्ते म्हणूनही बाळासाहेब ठाकरे यांची ओळख होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात राहून कधीही खुर्चीचा मोह केला नाही.