Badlapur Shocking Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Shocking : धक्कादायक! बदलापुरात १३ व्या मजल्यावरून तरुण खाली कोसळला

Badlapur News update : बदलापुरात १३ व्या मजल्यावरून तरुण खाली कोसळल्याची घटना घडलीये. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

मयुरेश कडव, साम टीव्ही

Badlapur News : बदलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. बदलापुरात १३ व्या मजल्यावरून मजूर कोसळल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्व येथील निर्माणाधीन मोहन विलोज इमारतीत ही घटना घडली. १३ व्या मजल्यावरून कोसळल्यानंतर मजुराला केईएम रुग्णालयायत दाखल करण्यात आलं. बदलापुरातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात निर्माणाधीन इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून पडून मजूर गंभीर जखमी झाला आहे. बदलापुरातील सुरवळ चौकातील मोहन विलोज इमारतीत ही घटना घडली. प्रमोद रामलाल खडीया असं या ३५ वर्षीय मजुराचं नाव आहे. प्रमोद हा मूळचा छत्तीसगडचा आहे. मोहन विलोज या निर्माणाधीन इमारतीत तो पत्नीसह काम करतो.

इमारतीत आज दुपारच्या सुमारास काम करत असताना 13 व्या मजल्यावरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. यावेळी तिथल्या लोकांनी त्याला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात नेलं, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला हलवण्यात आलं. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, या इमारतीच्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांच्या तपासात आता काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बदलापुरात दुचाकीस्वाराने महिलेला उडवलं

बदलापूरमध्ये एका स्टंटबाज दुचाकीस्वारानं स्टंटबाजी करण्याच्या नादात महिलेला आणि एका दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. अपघाताचा थरार 24 जून रोजी सायंकाळी 6 वाजता बदलापूर पश्चिम येथील मांजर्लीतील मोहन ग्रीनवुड परिसरात घडला. या स्टंटबाजांनी आधी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला उडवलं. त्यानंतर एका दुचाकीला धडक देत स्वतः सुद्धा पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा राडा; शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Investment Tips: फक्त १० हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; समजून घ्या गणित

Chanakya Niti : आयुष्यात एकदातरी प्रेमात पडलेल्यांनी नक्की वाचा 'या' सिक्रेट टिप्स

Maharashtra Live News Update : उपसभापती हरिवंश सिंह यांनी भूषवलं राज्यसभेचं सभापतिपद

Beed : मुलीचे अपहरण; वीस दिवसांपासून तपास लागेना, पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचे नातेवाईकांचा आरोप

SCROLL FOR NEXT