Prada Kolhapuri Chappal : महाराष्ट्र चेंबरचा प्रादाला कोल्हापुरी हिसका; मेन्स फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच

Prada Kolhapuri Chappal News : महाराष्ट्र चेंबरचा प्रादाला कोल्हापुरी हिसका दाखवलाय. मेन्स फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच असल्याची माहिती मिळत आहे.
kolhapur News
kolhapur Saam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल 'प्रादा' नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. त्यानंतर या चपलेचं मेन्स फॅशन शोमध्ये सादरीकरण झालं. त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवलाय. महाराष्ट्र चेंबरने इटली येथील 'प्रादा'चे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. याबाबत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिली. प्रादा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी महाराष्ट्र चेंबरला पत्रव्यवहार केलाय.

kolhapur News
Bank Rules : खातेधारकांनो बँक खात्यात १०,००० रुपये ठेवा, अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावा, वाचा नवीन नियम

कोल्हापुरी चपलेची जगभरात ओळख आहे. काही दिवसांपूर्वी 'प्रादा' नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल केली. त्यानंतर स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली आहे. मेन्स फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलेचा वापर केला गेलाय. कोल्हापूरची ही चप्पल इटालियन असल्याचे भासवले गेले. या प्रकाराने प्रादावर भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवण्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलाय.

kolhapur News
Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट; ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

प्रादा ​कोल्हापुरीसारखी चप्पल​ एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे​. तर भारतीय कारागीर ​तीच चप्पल ४०० रुपयांत बनवतात.​ या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणारे ​कारागरांत नाराजी होती. राज्यातील काही कारागीरांनी या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने लक्ष घालण्याची विनंती केली होती. यानंतर कोल्हापुरी चप्पलाची अस्मिता जाणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रादा कंपनीकडे पत्रव्यवहार केलाय.

kolhapur News
Election Commission : देशातील ३४५ राजकीय पक्षांना जोरदार दणका, निवडणूक आयोग थेट नोंदणी रद्द करणार?

प्रादा मेन्स २०२५ फॅशन शोमध्ये दाखवलेले चप्पल शतकानुशतके जुना वारसा असलेल्या पारंपारिक भारतीय हस्तकला पादत्राणे आहेत. जबाबदार डिझाइन पद्धती, सांस्कृतिक सहभाग वाढवणे आणि स्थानिक भारतीय कारागीर समुदायांशी अर्थपूर्ण देवाण घेवाणीसाठी संवाद उघडण्यास वचनबद्ध आहोत. उत्कृष्टता आणि वारशाचा अतुलनीय दर्जा दर्शवणाऱ्या अशा विशेष कारागिरांना मूल्य प्रादाकडून जपलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com