badlapur shocking  Saam tv
मुंबई/पुणे

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

badlapur shocking : बदलापूर पुन्हा संतापजनक घटना घडली आहे. शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

Vishal Gangurde

बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना

मिनी बस चालकावर ४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप

बदलापूरच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बदलापुरात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या बदलापूर शहरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीये. शाळेच्या मिनी बस चालकाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापुरात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेविरोधात संतप्त बदलापूरकरांनी लोकल ट्रेन थांबवल्या होत्या. बदलापूरच्या त्या घटनेचा संपूर्ण देशात निषेध नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी त्या घटनेतील मुख्य आरोपीचा एन्काऊंटर केला होता. आता त्याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती समोर आली आहे. बदलापूर पश्चिम भागात ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली. अत्याचाराच्या घटनेने बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं?

शाळेच्या मिनी बसमध्येच चालकाने ४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती चिमुकलीने घरी पालकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास देखील सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरच्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी घटनेचा निषेध केला. या घटनेवर प्रतिक्रया देताना दामले म्हणाल्या, ' बदलापुरातील खासगी शाळेच्या व्हॅन चालकाने चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार केलाय. या घटनेची प्राथमिक माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो. आरोपी व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पीडित मुलीला न्याय द्यावा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Threat Case : बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: उष्णतेपासून बचावासाठी ओंकार हत्तीची नळाच्या पाण्यात मस्ती

Accident : धनत्रयोदशीला काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ६ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

Weather Update : हवामानात मोठे बदल! ४ राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

SCROLL FOR NEXT