शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव! ६१ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी

Pakistan shopping mall fire : शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. ६१ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.
Pakistan shopping mall fire update
Pakistan shopping mall fire Saam tv
Published On
Summary

कराचीच्या मॉलमध्ये आगीत ६१ जणांचा मृत्यू

आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सर्वत्र पसरली

स्थानिक प्रशासनाला मृतदेहांची ओळख करणे कठीण

मॉलमध्ये सुरुवातीला खेळणे आणि कपड्यांच्या दुकानात लागली

पाकिस्तानच्या कराची शहरात शॉपिंग मॉलला शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ६१ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत आग सर्वत्र पसरली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी ३६ तासानंतर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

Pakistan shopping mall fire update
लाडकींना मोठा दिलासा, e-KYC बाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, महिन्याला १५०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा?

शॉपिंग मॉलच्या आगीत ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटवणे मोठे आव्हानात्मक ठरत आहेत. सिंध पोलिसांच्या पथकातील डॉ. सुमैया सैद यांच्या माहितीनुसार, स्फोटातील केवळ ६१ मृतदेहापैकी केवळ १२ जणांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आलं आहे. आगीनंतर अनेक मृतदेहांचे तुकडे सापडले आहेत. मृचदेहाची ओळख पटवण्यासाठी ५० लोकांचे डीएनए नमुने जमा केले आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून इतर मार्गाचाही अभ्यास केला जात आहे.

Pakistan shopping mall fire update
धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

दुर्घटना घडल्यानंतर कराचीचे आयुक्त सैयद हसन नकवी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मॉलला नेमकी कशी आग लागली, याचा शोध घेण्याचे आदेश आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. कराचीचे आयुक्त सैयद हसन नकवी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मॉलमध्ये सुरुवातीला खेळणे आणि मुलांच्या कपड्याच्या दुकानाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे शॉपिंग मॉलला आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Pakistan shopping mall fire update
बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

शॉपिंग मॉलमध्ये एकूण १२०० दुकाने होती. या मॉलमध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांचा अद्याप शोध घेणे सुरूच आहे. या मॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजही तपासले जात आहे. पालिकेच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास तब्बल १०-१५ दिवस लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com