Badlapur Case update  Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे अध्यक्ष-सचिवांना जामीन मंजूर

Badlapur Case update : बदलापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष-सचिवांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

कअभिजीत देशमुख, साम टीव्ही

बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहआरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी दोघांना कर्जतमधून अटक केली होती. त्यानंतर आज दोघांना दोन्ही प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील संबंधित शाळेचे संचालक उदय कोतवाल, तुषार आपटे यांना आज कल्याण कोर्टात हजर केलं होतं. या दोघांना एसआयटी टीमने कल्याण न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर कल्याण कोर्टाने उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना जामीन मंजूर केला आहे. काल एका गुन्ह्यात जामीन झाला होता. तर दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने तत्काळ ताबा घेतला होता.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील संबंधित शाळेचे संचालक तुषार आपटे, उदय कोतवाल यांना एसआयटी टीमने दुपारी कल्याण न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर आज कोर्टाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे. काल एका गुन्ह्यात जामीन झाला होता. तर दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने तत्काळ दोघांचा ताबा घेतला होता.

फरार सहआरोपींना कोर्टाकडून जामीन

बदलापूर अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना मंगळवारी कर्जतमधून अटक केली होती. दोघेही गेल्या दीड महिन्यांपासून फरार होते. महिनाभरापासून फरार असलेल्या शाळेच्या संचालकांना अटक करण्याच्या दिरंगाईवरून कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. दोघेही कर्जतमध्ये लपून बसले होते.

दोघे नेरळच्या दामत गावातील फार्म हाऊसवर होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेलाय. त्यानंतर शाळेच्या संचालकांवर कारवाई कधी होणार, याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही जामीन मंजूर

आज शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना २५ हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या दोघांना दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. या दोघांना जामीन मंजूर झाल्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले या कोर्टात हजर झाल्या. अर्चना आठवले यांना पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्या दुसऱ्या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी कोर्टात हजर झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनाही दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची फी निश्चित; कोणत्या कोर्ससाठी किती शुल्क? घ्या जाणून

ब्रह्म मुहूर्तावर 'या' शब्दांचा जप करणं आहे शुभं, वर्षभर घरी येईल पैसा

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

SCROLL FOR NEXT