बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंमुळे शिंदे गट अडचणीत आलाय.वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराशी बोलताना लाज सोडली. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे सर्व स्तरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ठाकरे गटानं तर म्हात्रेंना अटक करण्याची मागणी केलीय. तर त्यांच्याच मित्र पक्ष भाजपच्या महिला नेत्यांनी तर थेट म्हात्रेंचं तोंड फोडण्याचा इशारा दिलाय. म्हात्रेंच्या कारनाम्यावरचा हा रिपोर्ट.
बदलापूर अत्याचार प्रकरणाने राज्यासह संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आले. अशातच शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला घाणेरडी भाषा वापरली. वामन म्हात्रे यांच्या निर्लज्जपणामुळे सर्व स्तरांमध्ये संतापाची लाट पसरलीय. बदलापुरात वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना म्हात्रे नेमकं काय म्हटसे ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात.
म्हात्रे यांच्या या संतापजनक विधानामुळे विरोधकांनी त्यांच्या अटकेची मागणी केलीय. अंधारेंनी तर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. मात्र महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनीही म्हात्रेंवर टीकेची झोड उठवलीय. महिला नेत्यांनी तर थेट म्हात्रेंचं तोंड फोडण्याचीच भाषा केली. मात्र वामन म्हात्रेंनी हे सर्व आरोप फेटाळत महिलांचा नेहमीच आदर करत असल्याची सारवासारव केलीये.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर बदलापुरात राजकीय घडामोडी घडतायत..त्यात बदलापुरात किसन कथोरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी शिंदे गटाकडून वामन म्हात्रे इच्छुक असल्याचं त्यांनी याआधीही स्पष्ट केलं होतं.मात्र महिला पत्रकारावर म्हात्रेंनी केलेल्या वक्तव्यानं शिंदे गटाची चांगलीच अडचण झालीये...म्हात्रेंना उमेदवारी मिळेल की नाही हा प्रश्न असला तरी त्यांच्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट तोंडघशी पडलाय एवढं नक्की
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.