मुंबई: काँग्रेस नेत्या तथा मंत्री आणि अमवरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पडायला लागले आहेत. शिवसेनेच्या महिला नेत्यांनी सुचक वक्तव्य करत यशोमती ठाकूर यांचे कान टोचले आहेत. मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) काम करत आहेत त्यांनी यावेळी अश्या प्रकारे वक्तव्य करणं चूकीचं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) स्वत: आघाडीच्या सरकारमध्ये महर्षी म्हणून काम करतायेत, यशोमती ठाकुरांनी असे वादाचे मुद्दे तयार करु नयेत. असंच म्हणणं जर असेल तर या मंत्रीमंडळात तुम्ही मंत्री राहील्या नसत्या. पहिल्यांदी मंत्रीपद मिळालंय तर नीट काम करा असा सल्ला किशोरी पेडणेकर यांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे.
शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. वास्तव आहे की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचे प्रत्येक राज्यात नेटवर्क आहे. संसदेत काम केलं आहे. प्रश्नाची जाणं आहे. यूपीए अध्यक्ष केलं तर त्यांच्या ज्ञानाचा फायदा होईल. यशोमती ताई माझी मैत्रीण आहे असे निलम गोर्हे म्हणाल्या.
काय म्हणाल्या होत्या यशोमती ठाकूर...
दरम्यान काल शरद पवार अमरावतीच्या दौऱ्यावर होते. डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केले होते. भाषणात बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की लहान तोंडी मोठा घास घेते पण शरद पवार जर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असले असते. शरद पवार मोठे नेते आहेत. यावेळी उपस्थीतांनी टाळ्या वाजवल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.