बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आज मंगळवारी सकाळपासूनच बदलापूरकरांनी रेल्वेस्थानकावरच आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसला.
कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी आणि सीएसएमटी स्टेशनवरून कल्याणकडे जाणारी लोकलसेवा (Mumbai Local Train) ठप्प झाली. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. लोकलसेवा उशिराने सुरु असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या आंदोलनाचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील मोठा फटका बसला.
मुंबईहून पुणे तसेच नांदेडच्या दिशेने गाड्यांना विलंब झाला. मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. बदलापूर (Badlapur News) रेल्वेस्थानकावर आंदोलनकर्ते ठिय्या मांडून होते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा पूर्णत: खोळंबा झाला होता. पोलीस आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.
बदलापूर येथील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच शहरातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून संबंधित शाळेबाहेर आंदोलन सुरू केले होते. यातील काही आंदोलनकांनी थेट आपला मोर्चा बदलापूर रेल्वेस्थानकाकडे वळवला.
यादरम्यान, आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा तातडीने फासावर लटकवा, असे म्हणत आंदोलक रेल्वेरुळावर जाऊन बसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीमार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.