badlapur news  Saam tv
मुंबई/पुणे

बदलापुरात राजकीय वाद टोकाला; शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण

badlapur political news : बदलापुरात राजकीय वाद विकोपाला गेला आहे. शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

बदलापुरात शिंदेसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला

शिंदेसेनेच्या नगरसेवकांकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण

मारहाणीत सनी पाटील जखमी

शिवसेना नगरसेवक रोहन पाटीलसह 10 जणांवर गुन्हा दाखल

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापुरात पालिका निवडणुकीनंतर शिंदे गट आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाची तोडफोड, शिंदेंच्या स्वीकृत नगरसेवकाला मारहण झाल्याची घटना घडली होती. निवडणुका झाल्यानंतरही शिंदे गट आणि भाजपमधील वैमनस्य कमी होताना दिसत नाहीए. आता बदलापुरात पुन्हा एकदा भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

बदलापुरातील शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सनी पाटील असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी नगरसेवक रोहन पाटील, सूरदास पाटील यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सनी पाटील याचे वडील मारुती पाटील हे पालिका निवडणुकीत नगरसेवक रोहन पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला उभे होते. तेव्हापासूनच त्यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. आता एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट आमने-सामने आले. त्यावेळी नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील सहकाऱ्यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप सनी पाटील यांनी केलाय.

तत्पूर्वी, जानेवारी महिन्यातही भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यावेळी शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना गुरुवारी रात्री वालिवली भागात मारहाण झाल्याची घटना घडली होती. माराहाणीनंतर चतुरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

तेजस म्हसकर यांनी भाजपमध्येप्रवेश केला होता. म्हस्कर यांच्या भाजप प्रवेशाने आमदार कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्या गटात संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर कथोरे यांच्या निवासस्थान परिसरात राहणारे हेमंत चतुरे यांना शिंदे गटाने गळाला लावले होते. त्यामुळे चतुरे आणि म्हसकर यांच्यातील तणाव वाढला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT