badlapur News  Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur : ४ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ट्रेनने मध्य प्रदेश गाठलं अन्...; पोलिसांकडून २४ तासांत मुलीची सुटका, धक्कादायक माहिती समोर

badlapur kidnapping case : बदलापुरात ४ वर्षांच्य मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील अपहरणकर्त्याला २४ तासांत अटक केली आहे.

Vishal Gangurde

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापूर : बदलापुरात काही महिन्यांपूर्वी चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता शहरात एका चिमुरडीचं अपहरण झाल्याची घटना घडली. चिमुरडीच्या अपहरणानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपींची शोधाशोध सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी २४ तासांत अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली. तसेच बदलापूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून आरोपीने मध्य प्रदेश गाठलं होतं. रणजीत धूर्वे असे आरोपी मजुराचं नाव आहे. या मजुराला 24 तासांच्या आत उल्हासनगर आणि बदलापूर पोलीस पथकानं ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रणजीतच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपी रणजीत धुर्वे हा बदलापूर पश्चिमेकडील एका कन्स्ट्रक्शन साईडवर मजुरीचा काम करत होता. त्याच्या बाजूला राहणाऱ्या कुटुंबाचा रणजीतशी वाद झाला होता. या वादातूनच रणजीतने त्या मुलीचं अपहरण केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपयुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे. तसेच यामागे रणजीतचा अजून कोणता उद्देश होता, याबाबत पोलीस अधिक चौकशी करतायेत. पोलिसांनी अपहरणकर्त्याला मध्यप्रदेशमधून अटक केली आहे.

नेमकं त्या दिवशी काय घडलं?

प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक योगेशने सांगितलं की, आरोपी माझ्या रिक्षाात बसला होता. त्याच्यासोबत चार वर्षाची मुलगी होती. ती रिक्षात येत नव्हती. तिने दोन वेळा नकार दिला. त्यानंतर आरोपीने मुलीला बळजबरीने रिक्षात बसवलं. आरोपीला बदलापूर रेल्वे स्टेशनवर सोडलं. त्यानंतर त्याने कल्याणला सोडणार का विचारलं. मात्र, मी त्याला ट्रेनने जायचा सल्ला दिला. तरीही त्याने कल्याणला रिक्षाने सोडणार का, असे विचारलं. गर्दी नसताना रिक्षाने जायचं विचारल्याने संशय आला. त्यामुळे दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. मी माझ्या मित्रमंडळीना कळवलं. मी काही वेळाने पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मी काढलेले फोटो पोलिसांना दिले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT