BADLAPUR MUNICIPALITY TAKES ACTION AGAINST ILLEGAL FRUIT VENDORS ON KATRAP ROAD Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur : अनधिकृत फळ विक्रेत्यांची खैर नाही! बदलापूर नगरपालिकेकडून कारवाई सुरू

Badlapur News : बदलापूर पूर्वेतील कात्रप रोडवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली. वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • बदलापूर पूर्वेतील कात्रप रोडवरील अनधिकृत फळ विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई

  • नागरिकांच्या तक्रारीनंतर अतिक्रमण विभागाने रस्त्यालगतची दुकानं हटवली

  • काही विक्रेत्यांनी विरोध केला तरी प्रशासनाने नियमानुसार कारवाई पूर्ण केली

  • वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूर पूर्व परिसरातील कात्रप रोडवर अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्वेतील कात्रप रोडवर काही फळ विक्रेत्यांनी मुख्य रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे दुकानं थाटली होती. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत होती आणि वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात नागरिकांकडून पालिकेकडे सातत्याने तक्रारी दाखल होत होत्या. त्यानंतर अतिक्रमण विभागाने नियोजनबद्ध मोहीम राबवत संबंधित ठिकाणी कारवाई केली.

कारवाईदरम्यान काही फळ विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. विशेषतः काही महिला फळ विक्रेत्यांनी अधिकाऱ्यांना विरोध दर्शवत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. मात्र अतिक्रमण विभागाच्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत नियमानुसार कारवाई सुरूच ठेवली आणि अनधिकृतपणे उभारण्यात आलेली दुकानं हटवली.

या अवैध फेरीवाल्यांविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील आक्रमक भूमिका घेतली होती. स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे आणि नगरसेविका रती पातकर यांनी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या फेरीवाल्यांना नेमके कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत कारवाईची मोहीम हाती घेतली. पालिकेच्या या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया केवळ एकदाच न होता सातत्याने व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बदलापूर नगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांविरोधात यापुढेही कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले असून सार्वजनिक रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबवल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाल्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून तरुणाने परत आणलं, थरारक क्षण सीसीटीव्हीत कैद

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी निवडणूक

Blood Sugar: शुगर वाढलीये? घरातल्या या 6 औषधी वनस्पती करतील कमाल; डॉक्टरही सांगतात फायदे

Garlic pickle recipe: घरच्या घरी कसं तयार कराल लसणाचं लोणचं?

गर्लफ्रेंडकडून धर्मांतराची अट... अन् प्रियकराची आत्महत्या; चॅटने बाहेर आलं प्रकरण

SCROLL FOR NEXT