Badlapur Firing Video Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Firing Video : बदलापूर पुन्हा हादरलं! रेल्वे स्थानकातच गोळीबार; धक्कादायक घटनेचा VIDEO

badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं आहे. भर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेचा VIDEO समोर आला आहे.

अजय दुधाणे

बदलापूर : बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. बदलापुरात काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भयंकर घटना घडली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पुण्यातील वनराज आंदेकर गोळीबाराची घटना ताजी असताना बदलापूर भर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या वेळेत रेल्वे स्टेशनवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्थानकात कोणी कोणावर गोळीबार केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेने रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

बदलापुरातील होम प्लॅटफॉर्मवर गोळीबार

बदलापुरातील होम प्लॅटफॉर्मवर गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यक्तीने दोघांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती हाती घेतली. बदलापुरातील या गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं हे लक्षण आहे का,असा सवाल बदलापूरकर करत आहेत.

गोळीबार करणारा पोलिसांच्या ताब्यात

बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासानंतर पोलिसांनी काही वेळात गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

दरम्यान, बदलापूर रेल्वे स्थानकातील गोळीबाराच्या घटनेचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. या तरुणाने गोळीबार केल्यानंतर एक पांढरा शर्ट घातलेला तरुण घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे. गोळीबारानंतर दोन तरुण होमप्लॅटफॉर्मवरून रोडवर पळ काढताना दिसत आहेत. तरुणाने गोळीबार केल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडते. याचवेळी पोलीस देखील होमप्लॅटफॉर्मवर धाव घेताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT