Badlapur minor school girl abuse Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Case Update : अक्षय शिंदेकडून चिमुकलींवर अनेकवेळा अत्याचार; एसआयटी रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Badlapur Case Update : बदलापूर एसआयटी तपासानंतर धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अक्षय शिंदेकडून चिमुकलींवर अनेकवेळा अत्याचार केल्याची माहिती उघड झाली आहे. या माहितीनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Vishal Gangurde

बदलापूर : बदलापुरातील नामांकित शाळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महिलांसहित शाळकरी विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणवीर आला आहे. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेने संतप्त नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर रेल्वरोको करण्यात आला होता. बदलापूरकरांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली होती. या संतापजनक घटनेनंतर सरकारकडून या याप्रकरणी एसआयटीची स्थापना केली होती. या प्रकरणाचा एसआयटीने प्राथमिक रिपोर्ट सादर केल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बदलापूर प्रकरणातील एसआयटी प्राथमिक रिपोर्टमध्ये अक्षय शिंदने अनेकवेळा चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. अक्षय शिंदे हा सहज चिमुकल्यांपर्यत जात होता. त्याला कोणत्याही प्रकारचा अटकाव केला जात होता, अशी माहिती रिपोर्टमधून उघडकीस आली आहे. 'Times Now' या वृत्त माध्यमाने या संदर्भातील रिपोर्ट समोर आणला आहे.

बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर तक्रार नोंदवताना पोलिसांनी तक्रार नोंदवण्यासाठी ११ घेतले होते. पोलिसांनी तब्बल ११ तासांनी तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी तब्बल १० तास ताटकळत ठेवले होते. या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण बदलापूर पेटलं होतं.

अक्षय शिंदे हा पंधरा दिवसांपूर्वी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. अक्षय शिंदे मुलींचेही स्वच्छतागृह साफ करायचा. महिला कर्मचारी नसल्याने आरोपीकडून मुलींचे स्वच्छतागृह का साफ घेतले जात होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. आता शाळेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

बदलापुरातील घटनेनंतर पुण्यात पोलिसांची मोठी खबरदारी

बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची बैठक घेणार आहेत. पुणे पोलिसांकडून २९ ऑगस्ट रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील या बैठकीत शाळा महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा तसेच उपाययोजना या संदर्भात चर्चा जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT