Badlapur Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Crime: दुहेरी हत्याकांडाने बदलापूर हादरलं, धारदार शस्त्राने वार करत महिला अन् पुरूषाची हत्या; बंद कारमध्ये आढळले मृतदेह

Man and Woman Found Dead Inside Locked Car: बदलापुरमध्ये एका कारमध्ये महिला आणि पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. धारदार शस्त्राने वार करत दोघांची हत्या करण्यात आली.

Priya More
  • बदलापूरच्या जुवेली गावाजवळ बंद कारमध्ये २ मृतदेह आढळले

  • एक महिला आणि एका पुरुषाचे मृतदेह आढळले

  • दोघांच्याही शरीरावर धारदार शस्त्राने वार

  • बदलापूर पूर्व पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले

मयुरेश कडव, बदलापूर

दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने बदलापूर हादरले. बदलापूरच्या जुवेली गावाजवळ एका बंद कारमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. महिला आणि पुरूषाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राचे वार असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोलिस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या जुवेली गावाजवळ एका कारमध्ये दोन मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली. मृतांमध्ये एका पुरुषाचा आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे या दोघांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय

या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे. तर फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून पुरावे संकलित करण्याचं काम सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचं आणि हत्येमागील कारण शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमुळे बदलापूर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करतायत. हे दोघे एका कारमधून त्याठिकाणी आले होते. त्यामुळे ते बदलापूरमधील आहेत की बाहेरून आले होते याचा तपास देखील पोलिसांकडून सुरूा आहे.

पोलिसांनी सांगितले की, महिला आणि पुरुष ओला कारने बदलापुरात आले होते. महिलेचं नाव मनिषा भोसले तर ओला चालकाचं नाव ज्योतिबा शिंदे असं आहे. आपल्या आईला ओला चालकाने मारलं असा जबाब महिलेच्या ३ वर्षाच्या लहान मुलानं दिला आहे. तर ओला चालक ज्योतिबा शिंदे याची हत्या कुणी कोणी? याचा तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live Update: पुण्यात कॉकरोच पार्टीचे आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Sunita Ahuja: 'काश्मीरा माझ्या पायांवर पडली...'; कृष्णा अभिषेकसोबतचा वाद कसा मिटला? सुनीता आहुजांचा खुलासा

Navi Mumbai : शासकीय रुग्णालयाचा धक्कादायक कारभार, चुकीचं इंजेक्शन टोचल्याने गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप

Mumbai News: मॅनहोलमध्ये 'तो' माणूस कसा पडला? १० सेकंदाचा थरारक सीसीटीव्ही VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT