BHUVAN PATIL SHOT DEAD IN SAGAON VILLAGE NEAR BADLAPUR, POLICE INVESTIGATION UNDERWAY Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur : धक्कादायक! बदलापूरमध्ये २३ वर्षीय तरुणाची गोळी झाडून हत्या, परिसरात खळबळ

Badlapur Crime New : बदलापूरजवळील सागाव गावात २३ वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

Alisha Khedekar

  • बदलापूरजवळील सागाव गावात २३ वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू

  • मृतदेह टर्फलगतच्या लॉनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

  • बदलापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला

  • मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूरजवळील सागाव गावात एका 23 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत तरुणाचे नाव भुवन कृष्णा पाटील असे असून तो सागाव परिसरात क्रिकेट टर्फचा व्यवसाय चालवत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भुवन पाटील नेहमीप्रमाणे आपल्या क्रिकेट टर्फवर गेला होता. दरम्यान, अचानक गोळीबार झाल्याची घटना घडली. भुवनच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर त्याचा मृतदेह टर्फलगतच्या लॉनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला.

ही माहिती समोर येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच बदलापूर ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

तसेच घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे सागाव आणि बदलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भुवनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, की त्याच्याकडून चुकून गोळीबार झाला, अथवा हा घातपाताचा प्रकार आहे? या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise For Healthy Heart: हेल्दी हार्टसाठी रोज किती वेळ व्यायाम केला पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर मतदार यादीत उद्धव ठाकरेंच्या नावावर आक्षेपार्ह मजकूर? ठाकरे गटाची तक्रार

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

SCROLL FOR NEXT