Manasvi Choudhary
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या युगात हृदयविकाराचा झटका येण्याची संख्या वाढली आहे. केवळ वृद्धांनाच नाही तर तरूणांमध्येही याचे प्रमाण वाढले आहे.
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी आणि दिवसभर एकाच जागी बसून राहणे ही हार्ट फेल होण्याची मुख्य लक्षणे आहेत.
हृदय निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे,
वैद्यकीय सल्ल्यानुसार , एका निरोगी व्यक्तीने आठवड्यातून किमान १५0 मिनिटे व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही आठवड्यातून ५ दिवस आणि दररोज किमान ३० मिनिटे नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्डिओ व्यायाम सर्वात महत्वाचा आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी वेगाने चालणे, सायकल चालवणे, पोहणे, एरोबिक्स किंवा डान्स करणे महत्वाचे आहे.
व्यायाम तुम्ही किती वेळ करत यापेक्षा तुम्ही तो किती नियमितपणे करता, हे अधिक महत्त्वाचे आहे. रोज थोडा वेळ व्यायाम केल्यास हृदयाची कार्यक्षमता वाढते.
शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयावर येणारा ताण घटतो.
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मानसिक ताणतणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.