Akshay Shinde Encounter Investigation Saam Digital
मुंबई/पुणे

Badlapur Case: अक्षय शिंदे एन्काउंटर तपासावरून हायकोर्टानं सीआयडीला फटकारलं, कोर्टात काय घडलं?

Akshay Shinde Encounter Investigation: बदलापूरमधील दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरच्या घटनेच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयानं सीआयडीला फटकारलं आहे. या घटनेतील तपास सीआयडीकडून सहजपणे घेतला जात आहे, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.

Bharat Jadhav

बदलापूरमधील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेनं अवघा देश हादरला होता. ही घटना उघड झाल्यानंतर काही तासांच्या आतच आरोपीला अटक करण्यात आली होती. तर आरोपीला कठोर शिक्षा करायला हवी, या मागणीसाठी बदलापूरमध्ये तीव्र आंदोलन झालं होतं. आरोपी अक्षय शिंदेचा सप्टेंबर २०२४ मध्ये एन्काउंटर झाला होता.

मात्र, बनावट चकमकीत अक्षयची हत्या केल्याचा आरोप करणारी याचिका त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने सीआयडीला चांगलेच सुनावले आहे.

'सीआयडीचं वर्तन संशयाच्या फेऱ्यात'

आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं सीआयडीला खडे बोल सुनावले. सीआयडी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे घेत नाही असे दिसते. सर्व घटनांची निष्पक्षपणे चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. न्या. रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात त्यांनी सीआयडीचं सध्याचं वर्तन संशयाच्या फेऱ्यात असल्याचे मत व्यक्त केले आहे.

उच्च न्यायालय काय म्हणालं?

निष्पक्ष तपास व्हावा यासाठी स्थानिक पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला जातो. तपासाचे दस्तावेज एकत्रित करून ते योग्य तपासासाठी मॅजिस्ट्रेटकडे सोपवले जावेत, हे सुनिश्चित केलं पाहिजे. प्रत्येक घटनेचा तपास निष्पक्ष व्हायला हवा. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांचाही तो अधिकार आहे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी खंडपीठाने केली. त्यावर सर्व दस्तावेज आणि माहिती मॅजिस्ट्रेट यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. उर्वरित दस्तावेज आठवडाभरात सोपवण्यात येतील अशी माहिती न्यायालयात देण्यात आली.

२० जानेवारीला पुढील सुनावणी

या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तोपर्यंत मॅजिस्ट्रेटकडून न्यायालयात अहवाल सादर करावा लागणार आहे.

या घटनेत पोलिसांनी काय सांगितलं होतं?

आरोपी अक्षय शिंदे याला २४ सप्टेंबरला एका दुसऱ्या प्रकरणात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून ठाण्याकडे पोलीस व्हॅनमधून घेऊन जात होते. त्याचवेळी त्याने पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून घेतलं. शिंदे यानं व्हॅनमध्येच तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पोलीस अधिकाऱ्याला लागली. तो जखमी झाला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. त्यातील गोळी अक्षय शिंदेला लागली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

अक्षय शिंदेच्या हातातील बेड्या काढण्यात आल्या होत्या. कारण त्याने पाणी मागितलं होतं, त्याला पाणी प्यायलाही दिलं, असा दावा पोलिसांनी केला होता. त्यावर शिंदेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला. सीआयडी तपास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

अक्षय शिंदेच्या वडिलांचं म्हणणं काय?

अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बनावट चकमकीत अक्षयची हत्या करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. यावर सुनावणी करताना कोर्टाने पोलिसांना अनेक प्रश्न विचारले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT