BADLAPUR ILLEGAL FISH VENDORS CRACKDOWN | CLEANLINESS DRIVE ACTION Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापुरात उघड्यावर मासे विक्रीवर बंदी, प्रशासनाचा मोठा निर्णय

Badlapur News : बदलापूर शहरात बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या तक्रारींनंतर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, स्वच्छता अभियानाला गती देण्यात येत आहे.

Alisha Khedekar

  • बदलापूरमध्ये बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू

  • दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त

  • प्रशासनाने निश्चित जागेवरच विक्री करण्याचे आदेश दिले

  • स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी कठोर पावले

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात आता प्रशासन आक्रमक झालेलं पाहायला मिळतं आहे. शहरात ठिकठिकाणी बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांमुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान या कारवाईचा मासळी विक्रेत्यांना मोठा फटका बसणार असून आता पुढे या प्रकरणात काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बदलापूर शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर विशेष भर दिला जात असून यापूर्वी शहराला दोन वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कारही मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांकडून प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे.

तसेच वसईसह विविध भागांतून येणारे मच्छी विक्रेते बदलापूरमधील प्रमुख चौक आणि नाक्यांवर बसून विक्री करतात. काही ठिकाणी मनाई असतानाही रस्त्याच्या कडेला मच्छी विक्री होत असल्यानं त्या परिसरात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरत आहे. संध्याकाळी मच्छी विक्री संपल्यानंतर अनेक विक्रेते कचरा आणि घाण तशीच सोडून जात असल्यानं नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहर पुन्हा एकदा स्वच्छता अभियानात अव्वल क्रमांकावर यावं यासाठी नागरिकही सहकार्य करत असल्याचं घोरपडे यांनी सांगितल आहे. दरम्यान, मच्छी विक्रेत्यांनी प्रशासनानं निश्चित करून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच सर्व मच्छी विक्रेत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाची भेट घ्यावी, त्यानंतर योग्य जागा निश्चित करून परवानगी दिली जाईल, असंही माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT