Badlapur School Girl Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Badlapur News : बदलापूर घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; चामटोली गावातून २१ वर्षीय तरुणीला अटक

Badlapur School Girl Crime News : रुतिका प्रकाश शेलार (वय २१) असं या तरुणीचं नाव असून ती चामटोली गावात राहणारी आहे. ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध तिला अटक केली आहे.

अजय दुधाने

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत ४ वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला. ही वार्ता महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे मॅसेज आणि अफवा पसरवणारा मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे.

रुतिका (वय २१) असं या तरुणीचं नाव असून ती चामटोली गावात राहणारी आहे. ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध तिला अटक केली आहे. तिच्याविरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा बदलापूर (Badlapur News) पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींवर अत्याचार झाल्यानंत रुतिका हिने सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईचा उल्लेख करण्यात आला होता. दोघांच्या प्रकृतीविषयीचा मजकूर पोस्टमध्ये होता. ही पोस्ट वाचल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली होती.

दरम्यान, रुतिका हिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टमुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळेच परिसरातील वातावरण बिघडले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातोय. याप्रकरणी सायबर सेलने तपासाची चक्रे फिरवत रुतिका हिला अटक केली आहे.

यानंतर सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या पोस्ट दिसल्या तर त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच सदरील पोस्ट शेअर करू नये, असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी नागरिकांना केलंय. कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिलाय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT