CJI Dhananjaya y. chandrachud  Saam Digital
मुंबई/पुणे

Ram Janmabhoomi Verdict : राम जन्मभूमीचा निकाल कसा दिला? धनंजय चंद्रचुड यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Dhananjaya Chandrachud : राम जन्मभूमीचा ऐतिहासिक निकाल कसा दिला, याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी माहिती दिली आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अयोद्ध्या राम जन्मभूमीचा ऐतिहासिक निकाल तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी दिला होता. हा निकाल आपण कसा दिला याच्या मागचं गुपीत पहिल्यांदाच धनंजय चंद्रचुड यांनी सांगितलं आहे.

चंद्रचुड हे त्यांच्या मुळ गावी म्हणजे खेड तालुक्यातील कन्हेरसर इथे आले होते. त्यावेळी त्यांनी अयोद्धेचा निकाल देणे कसे अवघड होते? त्यातून कसा मार्ग काढला याचा खुलासा केला.

डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचे मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील कन्हेरसर येथे सहपत्नी भेट दिली. धनंजय चंद्रचुड सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्याच मुळगावी आले होते. यावेळी ग्रामस्थांनी स्वागत करुन त्यांचा सन्मान केला.

यावेळी त्यांनी अयोद्धेच्या निकालाबाबत आतली गोष्ट सांगितली. अयोद्धेच्या केसची सुनावणी माझ्या पुढे आली होती. त्यावर तीन महिने विचार करत असताना एक जाणवलं. शेकडो वर्ष प्रलंबित राहिलेला विषय आमच्यापुढे आला. त्यावेळी यावर मार्ग कसा काढायचा असा प्रश्न समोर आला होती.

त्यावेळी देवाच्या समोर बसुन अयोद्धेचा मार्ग तुम्हीच शोधुन द्या, अशी विनंती देवांना केली. आपला विश्वास आणि आस्था असेल तर मार्ग देव शोधून देतातच, अशी भावना यावेळी धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT