Mango Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांनाे! APMC त आंबा झाला स्वस्त; जाणून घ्या दर

यावर्षी आंब्याच्या ७६ हजार पेट्यांपेक्षा अधिक आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतील (navi mumbai) एपीएमसी बाजारपेठेत (apmc market) आज (गुरुवार) हापूस आंब्याची (mango) विक्रमी आवक झाली आहे. तब्बल एक लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे अशी माहिती एपीएमसीचे संचालक संजय पानसरे (sanjay pansare) यांनी दिली. (apmc market latest marathi news)

पानसरे म्हणाले कोकणातील (kokan) ७६ हजार पेट्यांची तसेच कर्नाटकातील (karnatak) हापूस आंब्याची (alphonso mango) २५ हजार पेट्यांची आवक आज झाली आहे. आवक वाढल्याने आंब्याचे भाव ही कमी झालेत. एक हजार रुपयांपासून तीन हजारांपर्यंत एक पेटी आज नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये (घाऊक बाजारपेठेत) विकली जात आहे.

अक्षय तृतीया या सणास मुंबईकरांसाठी मुबलक आंबा उपलब्ध झाल्याचे पानसरेंनी नमूद केले. दरम्यान गतवर्षी सर्वात जास्त ६२ हजार पेट्यांची आवक झाली होती. यंदा ७६ हजार पेट्यांची आवक झाल्याने एक नवा विक्रम झाल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray Exposes 4500 Fake Voters: व्होट चोरीचे 4500 पुरावे, राज ठाकरेंनी मोर्चात आणले पुराव्यांचे गठ्ठे

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार

Mumbai Local Train Update: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, वर्ल्डकपशी कनेक्शन

Vote Scam Storm: भाजपच्या मित्रांचाही व्होट चोरीचा आरोप, व्होट चोरीवर भाजपचे मित्र विरोधकांसोबत?

Bomb Threat on Indigo Flight: विमानात मानवी बॉम्बची धमकी; ईमेल मिळताच इंडिगो फ्लाइटचं मुंबई एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

SCROLL FOR NEXT