Nitin Bangude Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Nitin Bangude Patil: ध्येय गाठायचं असेल तर.., नितीन बानगुडे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र

YIN Summer Youth Summit 2024: सकाळ माध्यम समूहाच्या 'यिन समर युथ समिट' या कार्यक्रमात प्रेरणादायी वक्ते आणि लेखक नितीन बानगुडे पाटील यांनी तरुणांना ध्येय गाठायचं असेल तर काय करावं, याची माहिती सांगितली आहे.

Satish Kengar

ज्यांच्या गाड्या गॅरेजमध्ये आहेत, त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही. मात्र ज्यांच्या गाड्या गॅरेजमध्येच आहेत, त्यांना आयुष्यात कधीही ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, असं प्रेरणादायी वक्ते आणि लेखक नितीन बानगुडे पाटील म्हणाले आहेत. सकाळ माध्यम समूहाच्या 'यिन समर युथ समिट' या कार्यक्रमात तरुणांना संबोधित करताना त्यांनी यशाचा मंत्र सांगितला आहे.

ते म्हणाले आहेत की, ''ध्येय गाठायचं असेल तर गाडी रस्त्यावर आणावीच लागेल आणि रस्ते म्हटले तर खड्डे ठरलेले आहेतच. ऊन, वारं, वादळ, पावसाशी झुंझ ठरलेली. ही सगळी झुंझ सोसणं ज्याला जमतं, ही सगळी लढाई लढणं ज्याला जमतं, त्यालाच यश जिंकता येतं.''

जगभरात भारतीय तरुणांचा डंका

या कार्यक्रमात बोलताना नितीन बानगुडे पाटील म्हणले की, ''ज्या मुलांनी यथे राहून देशाची अर्थव्यवस्था घडवली पाहिजे, हा देश विकसित केला पाहिजे, हा देश महासत्ता केला पाहिजे. ते स्वतःचं ज्ञान इतर देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी खर्ची घालत आहेत. ही आपली अलीकडची सर्वात मोठी अडचण आहे.''

ते म्हणाले, ''आज अॅपलमध्ये 34 टक्के मुलं भारतीय आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये 32 टक्के भारतीय मुलं आहेत. इंटेलमध्ये 17 टक्के भारतीय मुलं आहेत आणि नासात 36 टक्के भारतीय मुलं आहे. म्हणजेच जगभरात आज भारतीय तरुणांचा बोलबाला आहे. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. इतकी प्रतिभा, इतकी बुद्धिमत्ता आपल्या देशाच्या विकासासाठी खर्ची घातली, तर आपला देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT