Kondava Police Station, Pune Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी, तिघांविरोधात गुन्हा दाखल

या धक्कादायक प्रकरणात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे- नोकरीचे आमिष दाखवत २६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अत्याचार करत फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही माहिती तपासात समोर आली आहे.

या धक्कादायक प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिस ठाण्यात ३ जणांविरोधात भारतीय दंडात्मक कलम ३७६ (२), ५०६, ३८४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात डंजो या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत २६ वर्षीय महिलेवर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोंडवा परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणात आरिफ खान, रवी आणि रियाज अशा ३ जणांविरोधात पोलिसांनी बलात्कार,खंडणी यासारखे गुन्हा दाखल केला आहे.

आरिफ खान याने पीडित महिलेला तो तिच्या पतीचा मित्र आहे असं सांगून डंजो या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले. डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे सांगत आरिफने पीडित महिलेला एक डिलिव्हरी करायची आहे असे सांगत बोलावून घेतले. त्यानंतर त्याने त्या महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. या सगळ्या बाबत कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करील अशी धमकीही दिली.

या प्रकरणातील दुसरा आरोपी रवीने त्या महिलेला १ लाख रुपयाची खंडणी ही मागितली. तसेच यातील तिसऱ्या आरोपीनेही महिलेला वारंवार धमकावले. या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली, हा सगळा प्रकार जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडलाची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT