Rahul Narvekar
Rahul Narvekar  Saam Tv
मुंबई/पुणे

देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोण आहेत? जाणून घ्या

Santosh Kanmuse

मुंबई: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ओळख करुन दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. कोण आहेत नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) जाणून घेऊया.

राहुल नार्वेकर हे राजकीय घराण्यातील आहेत. ते महाराष्ट्रातील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांची लढत महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्या विरोधात झाली. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा याअगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध होता. राहुल हे शिवसेनेच्या युथ विंगचे प्रवक्तेही होते. राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर नगरसेवक होते. २०१४ मध्ये राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही.

शिवसेनेने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती, मात्र राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला. यानंतर राहुल नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त होते. महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता सोमवारी फ्लोर टेस्ट होणार आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT