Nana Patole Saam Tv
मुंबई/पुणे

Assembly Speaker Election: राज्यपाल हे 'भाजप'पाल, नाना पटोलेंचं टिकास्त्र

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होऊ शकत नाही.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राज्यपाल आणि महाविकास आघाडी संघर्ष संपता संपत नाहीये. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या (Assembly Speaker Election) निवडणुकीबाबतच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी यासाठी राज्य सरकारतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना एक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) माध्यमांशी बोलताना म्हणाले की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होऊ शकत नाही. हे कारण देऊन निवडणूकसाठी वेळ दिली नाही त्यामुळे ते राज्यपाल कमी आणि भाजपपाल आहेत असा आमचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांनी भेट घेतली पुढील आठवड्यात या निवडणुकी संदर्भात रणनीती ठरवली जाईल. पुढील आठवड्यातच विधानसभा अध्यक्ष निवडणूक होणार हे निश्चित आहे असेही नाना पटोले म्हणाले. मुख्यमंत्री आज विधिमंडळात आले तेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी या मागणीसोबत मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे आमदार त्यांना भेटायला गेले होते. 'राज्यपाल मंजुरी देत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ शकत नसल्याचं', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता राज्यपाल आणि महाविकास आघाडी संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

SCROLL FOR NEXT