MVA Plan Assembly Election: Mid Day
मुंबई/पुणे

Assembly Election: मविआमध्ये ठाकरे गट मोठा भाऊ; मुंबईत मिळणार जास्त जागा

MVA Plan Assembly Election: मविआत ठाकरे गट शिवसेना मोठा भावाची भूमिकेत असणार असून मुंबई ठाकरे गटाला सर्वाधिक जागा दिल्या जाणार आहेत.

Bharat Jadhav

महाविकास आघाडीत ठाकरे गट मोठा भाऊच्या भूमिकेत राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईतून सर्वाधिक जागा मिळणार आहे. मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार असून महाविकास आघाडी त्यापार्श्वभूमीवर तयारीला लागलीय. लोकसभेत यशस्वी अजेंडा राबवल्यानंतर मविआ विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यावरुन घेरायचं याची रणनीती ठरवत आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मुंबईत बैठक सुरू आहेत. ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 20 जागांची मागणी केलीय. ठाकरे गटाचा मुंबईतील असलेला बेस आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेलं प्रचंड यश यामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे 20 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईतील एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत एका जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या बैठकीसंदर्भात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ असेल, यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही जे सत्य आहे ते सत्य आहे. आजच्या बैठकीत फक्त राजकीय चर्चा झाली. बदलापूर घटनेवरून महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतील यावर चर्चा झाली. शाळांच्या गेटवर पालकांची प्रचंड गर्दी होत आहे. मुलं सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत आहेत. बदलापूर कांड भयंकर आहे माणुसकीला काळीमा फासणारा कांड असल्याचं आव्हाड म्हणालेत.

वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 20 जागांवर दावा सांगितलाय. ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ 16 जागा देण्यास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत तीन जागांवर विजय मिळवला होता. एका जागेवर ठाकरे गटाचा निसटता पराभव झाला. मुंबईत काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाला फक्त प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. त्याच आधारे ठाकरे गटाने मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा सांगितल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

SCROLL FOR NEXT