Aslam Shaikh  - Saam Tv
मुंबई/पुणे

Aslam Shaikh : माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होणार? ईडीने महापालिकेकडून मागवला 'हा' अहवाल

ईडीने माजी अस्लम शेख यांच्या मढ मालाड परिसरातल्या बेकायदेशीर स्टुडिओ संदर्भात बनवलेला पालिकेचा अहवाल मागवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Aslam Shaikh News : ईडीने माजी अस्लम शेख यांच्या मढ मालाड परिसरातल्या बेकायदेशीर स्टुडिओ संदर्भात बनवलेला पालिकेचा अहवाल मागवला आहे. पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी बजावलेल्या अहवालाची माहिती ईडीने पालिकेकडे मागवली आहे. या प्रकरणावरून माजी मंत्री काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

ईडीने माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या मढ मालाड परिसरातल्या बेकायदेशीर स्टुडिओ संदर्भात बनवलेला पालिकेने अहवाल मागवला आहे. पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी बजावलेल्या अहवालाची माहिती ईडीने पालिकेकडून मागवलली आहे. मढ परिसरात माजी मंत्री अस्लम शेख यांनी बेकायदेशीर स्टुडिओ बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता.

उपायुक्त हर्षद काळे यांनी मढ परिसरात असणाऱ्या ४९ स्टुडिओसंदर्भात ५ हजार पानांचा एक अहवाल करून चहल यांच्याकडे सोपावला आहे. शिवाय या बेकायदेशीर स्टुडिओ प्रकरणात जर एका एखादा गुन्हा दाखल झाला असेल, तर त्याचीही माहिती ईडीकडून मागविण्यात आली आहे.

कथित स्टुडिओ घोटाळ्यावरून सोमय्यांचे अस्लम शेख यांच्यावर काय आरोप आहेत?

मुंबईतील मढ येथे बेकायदा स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. यात तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. स्टुडिओ उभारताना सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालं आहे. समुद्रात स्टुडिओ उभारले पण कागदोपत्री ही जागा समुद्रापासून दूर असल्याचं दाखवलं आहे.

२०२१ मध्ये हे स्टुडिओ उभारण्यात आले. पर्यावरण खात्याने ६ महिन्यासाठी सेट उभारण्याची परवानगी दिली होती. पण कांदळवन तोडून स्टुडिओ उभारल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. अस्लम शेख यांच्या आशिर्वादाने घोटाळा झाला, या जागेवर आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती, असा सोमय्यांचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पिंपरी चिंचवड पोलीस; ४४ लाख रुपयाची मदत

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! 'त्या' GR ला स्थगिती देण्यास नकार, कोर्टात नेमकं काय घडलं?

Virar News: माझ्या आईला न्याय द्या! चिमुरडीचं हृदयस्पर्शी आंदोलन|VIDEO

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात मोठी बातमी, GR ला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

ठाणेकरांसाठी गुड न्यूज! डिसेंबरमध्ये मेट्रोचे २ नवे मार्ग सुरू होणार, सरनाईकांनी दिली डेडलाईन, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT