Chandrashekhar Bawankule On Satyajit Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. कारण, या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेससोबत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी या निवडणुकीचा निकाल हाती आला. अटीतटीच्या लढाईत सत्यजित तांबे यांचा विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. (Latest Marathi News)
दरम्यान, या विजयानंतर सत्यजित तांबे हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. कारण, निवडणूकीत भाजपने त्यांना उघडपणे पाठिंबा दिला नसला, तरी भाजपच्याच छुप्या पाठिंब्यामुळे तांबे हे निवडून आल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. अशातच सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. (Maharashtra Political News)
काय म्हणाले चंद्रशेख बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानपरिषदेत महाविकास आघाडीच्या विजयावर बोलताना बावनकुळे म्हणाले, नागपुरातील पराभूत झालेला उमेदवार आमचा नव्हता.
नागपूरची जागा आम्ही कधीच लढत नाही. ती शिक्षक परिषद लढते. भाजपने त्यांना फक्त पाठिंबा दिला होता. यावर विरोधी पक्षाने हुरळून जाऊ नये, असा टोला चंद्रशेख बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा तसेच पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची चर्चा होती. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “सत्यजित तांबे यांना आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. त्यांनी भाजपमध्ये यायचे की नाही हे ठरवायचे आहे. त्यांना स्थानिक पातळीवर भाजपने मदत केली आहे.” असे ते म्हणाले.
नाशिकमध्ये भाजपला उमेदवार का मिळाला नाही, या चर्चेवरही बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. “भाजपचे जेष्ठ नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी द्या, म्हणून मी आग्रह करत होतो. मात्र, त्यांनी शेवटच्या क्षणी असमर्थता दर्शवली. तुल्यबळ उमेदवार नसल्याने उमेदवार देऊ शकलो नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.