Raut's Notice To Narayan Rane : नारायण राणेंच्या अडचणी वाढणार? संजय राऊतांनी पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

Raut Vs Rane: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut vs Narayan Rane
Sanjay Raut vs Narayan RaneSaam TV
Published On

Sanjay Raut vs Narayan Rane : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, राणे यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बदनामीचा दावा दाखल केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी राणेंना नोटीस सुद्धा पाठवली आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut vs Narayan Rane
Dnyaneshwar Mhatre : निवडणूक जिंकली, पण चोरट्यानं खिसा कापला; जल्लोषावेळी ज्ञानेश्वर म्हात्रेंचे ७५ हजार लांबवले

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा त्यांनी केला होता. राणेंच्या या विधानामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा राऊतांनी केला आहे. त्यावर त्यांनी राणेंना नोटीस देखील पाठवली आहे.

नारायण राणे मागील काही महिन्यांपासून राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत आहेत. राणे यांनी संजय राऊत यांच्यावर वेळोवेळी अनेक आरोपी देखील केले आहेत. राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी आधी काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना आणि राणे यांच्यातून हा संघर्ष कायम आहे.

Sanjay Raut vs Narayan Rane
BBC Documentary वरून सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, फक्त ३ आठवड्यात...

तसेच राणे पुत्रांकडूनही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. राणे आता भाजपमध्ये आहेत. राणे आणि त्यांच्या मुलांकडून सातत्याने संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या आरोपांवरूनच राऊत यांनी राणे यांना थेट आव्हान देत नोटीस बजावली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आपण नारायण राणे यांना आपण नोटीस बजावली असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. 'राणे सार्वजनिक मंचावरुन तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करीत आहेत. हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी. माझ्या वकीलांमार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाईबाबत नोटीस बजावली आहे', असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com