Assistant Police Inspector Ashwini Bidre killed case  Saam Tv News
मुंबई/पुणे

Ashwini Bidre Case: मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप

Assistant Police Inspector Ashwini Bidre killed case : पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Priya More

सहाय्यक पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज लागला. या प्रकरणातला मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच त्याला २० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. पनवेल सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

त्याचसोबत या प्रकरणातील इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१६ मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती. अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते इथल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरसह त्याचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना पनवेल सत्र न्यायाधीशाने दोषी ठरविले आहे. दोषी अधिकाऱ्यांसह साथीदारांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. न्यायालयाने कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

तर इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली. पण या दोन्ही आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे त्यांना तुरूंगातून सोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करून ७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे दोन्ही आरोपींची ७ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे दोघांचीही सुटका करण्यात येणार आहे. लवकरच त्यांची रिलीज ऑर्डर काढण्यात येणार आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि विशेषत: पोलिस दलाचे लक्ष लागले होते. पनवेल इथल्या सत्र न्यायाधीश कृ. प पालदेवार यांनी या हत्याकांड प्रकरणाचा निकाल दिला. अश्विनी बिद्रे यांचे अपहरण, हत्या, शरीराचे कटरने तुकडे करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकरला दोषी ठरवले होते. तसेच त्याचे साथीदार कुंदन भंडारी , महेश फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. आज न्यायालयात या हत्याकांड प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कुरुंदकरला जन्मठेप सुनावली. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी बिद्रे- गोरे कुटुंबीय तसेच आळते, हातकणंगले इथले नातेवाईक, ग्रामस्थ आले होते.

दरम्यान, पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या १९ एप्रिल २०१६ मध्ये करण्यात आली होती. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्याचे तात्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती. हत्येनंतर अभय कुरुंदकरने कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या शरिराचे तुकडे करून विल्हेवाट लावली होती. याप्रकरणी संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी अश्विनी बिद्रे यांची कन्या सिद्धी गोरे आणि पती राजू गोरे यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT