Breaking News: शाहरुखची 'मन्नत' पुर्ण; आर्यन खान अखेर जेल मधून बाहेर Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: शाहरुखची 'मन्नत' पुर्ण; आर्यन खान अखेर जेल मधून बाहेर

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणी गेल्या २६ दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे.

सुरज सावंत

मुंबई: शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणी गेल्या २६ दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. परवा आर्यन खानला प्रचंड प्रतिक्षेनंतर जामीन मंजूर झाला. काही कायदेशीर बाबींमुळे कालचीही रात्र आर्यन खानला जेलमध्येच काढावी लागली होती. मात्र आज आर्यन खान तुरुंगातून अखेर बाहेर आला आहे. आर्यन खानच्या वतीने अभिनेत्री चुही चावला (Juhi Chawla) जामीनदार झाली आहे. आर्यन खानच्या जामीनासाठी शाहरुख खानने देशातील मातब्बर वकीलांनी टीम कामाला लावली होती.

दरम्यान २ ऑक्टोबरच्या रात्री एमसीबीने कार्डीलिया क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापा टाकला. त्यामध्ये आर्यन खानसह २० जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी सुरु झाली चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या, त्यामध्ये आर्यनचा तुरुंगवास वाढतच गेला. आर्यन खानला अटक झाल्यानंतर राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी ही कारवाई कशी फर्जी आहे हे पुराव्यानिशी दाखवले. त्यांनी काही पुरावे देखील माध्यमांसमोर ठेवले. एनसीबीचे पंच असलेले मनिष भानुशाली आणि किरण गोसावी यांची नावही नवाब मलिक यांनी सर्वांसमोर आणली. त्यानंतर मग आर्यन खान प्रकरण नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्या भोवती फिरु लागले.

आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची डिल झाली, त्यामध्ये ८ कोटी समीर वानखेडे घेणार असल्याचा खळबळजनक आरोप किरण गोसावीचा बॉडीगार्ड आणि एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर साईलने केला. त्याने संपुर्ण कारवाईचा तपशील माध्यमांसमोर मांडला आणि आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे राज्य सरकारने त्याला सुरक्षा देखील पुरवली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT