आरोपी राकेश मौर्य गोपाल मोजघरे
मुंबई/पुणे

कला दिग्दर्शक राजू सापतेंच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

व्हिडीओ प्रसिद्ध करुण केली होती आत्महत्या

गोपाल मोटघरे

कला दिगदर्शक राजू सापते यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्य पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याच्या तयारीत होता त्याला वाकड मध्ये पोलिसांनी केली अटक आहे. आत्ता पर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर 5 आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, टीव्ही जगातले सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते Raju Sapte यांनी काही दिवसांपुर्वी आत्महत्या Suicide केली होती. सोबतच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ Video प्रसिद्ध केला होता. त्यांनी त्या व्हिडीओ मध्ये म्हटले होते की, काम करत असताना एका युनियनचा पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्याच्या Pune राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण आणि आपल्या व्यथा स्पष्ट केल्या होत्या.

राजू सापते काय म्हणले होते ?

आत्महत्येपूर्वी राजू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणतात, ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही. मी पूर्ण विचाराअंती हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत.

माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिकडे नाही. राकेश मौर्या युनियनमधल्या काही लेबर लोकांना मुद्दामून फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’ असा धक्कादायक आरोप झाल्याचे त्यांनी आपल्या व्हिडिओत सांगितले होते.

पुढे ते म्हणतात ‘हे कालही मी क्लीअर केलं आहे, नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट केलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाही आहेत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे.

त्यातलं काल एक प्रोजेक्ट झी ZEE चे मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नव्हते. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं होतं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT