आता ATM मधून 5 मिनिटात काढता येणार कडधान्य; जाणून घ्या प्रक्रिया

देशातील हे पहिलेच एटीएम आहे, ज्यात पैशांऐवजी धान्य निघणार आहे. हे एटीएम (Grain ATM) हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्थापन केले गेले आहे.
आता ATM मधून 5 मिनिटात काढता येणार कडधान्य; जाणून घ्या प्रक्रिया
आता ATM मधून 5 मिनिटात काढता येणार कडधान्य; जाणून घ्या प्रक्रियाSaam Tv
Published On

जर तुम्हालाही पूर्वी कमी रेशन (Ration) मिळत होते किंवा बऱ्याच वेळ ताटकळत थांबावे लागत होते, तर आता त्याची बिलकूल चिंता करण्याची गरज नाही. नव्या उपक्रमांतर्गत ग्रेन एटीएम (Grain ATM) उभे करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही एटीएमच्या मदतीने 5 मिनिटात धान्य काढू शकता. देशातील हे पहिलेच एटीएम आहे, ज्यात पैशांऐवजी धान्य निघणार आहे. हे एटीएम हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्थापन केले गेले आहे. या एटीएमचा मोठा फायदा म्हणजे आपल्याकडे कमी रेशन मिळण्याची तक्रारी पूर्णपणे बंद होतील. हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील पहिले वहिले ‘ग्रेन एटीएम’ उभारण्यात आले आहे.

एकावेळी किती धान्य काढू शकता?

या एटीएम मशीनद्वारे पाच ते सात मिनिटांत एका वेळी 70 किलो धान्य काढू शकता. गुरुग्रामच्या फारूक नगरमध्ये स्थापन केलेली ही बँक पुर्णपणे एटीएमच्या धर्तीवर काम करणार आहे. अंगठा लावून ग्राहकांना येथून धान्य काढचा येणार आहे.

किती प्रकारचे धान्य बाहेर येईल?

या धान्य मशिनमध्ये टच स्क्रीनसह बायोमेट्रिकप्रणाली देखील लावण्यात आली आहे. या मशीनमधून धान्य काढून घेण्यासाठी लाभार्थ्यास आधार आपल्या रेशन कार्डचा नंबर द्यावा लागेल. त्याचवेळी मशीनमधून तीन प्रकारची धान्ये काढली जातील, ज्यात गहू, तांदूळ आणि बाजरीचा समावेश असेल.

एटीएममध्ये आहे अद्ययावत सेवा

ही एक स्वयंचलित यंत्र आहे, जे बँकेच्या एटीएमप्रमाणे काम करते. बायोमेट्रिकच्या मदतीने त्यातून धान्य काढता येईल. बायोमेट्रिक प्रणालीद्वारे खात्री करून घेतल्यानंतर सरकारने लाभार्थ्यांना ठरविलेले अन्नधान्य मशीनअंतर्गत बसविलेल्या बॅगमध्ये आपोआप भरले जाईल. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापन होणाऱ्या या यंत्राला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, धान्य वितरण मशीन असे म्हटले जाते. अधिकारी अंकित सूद यांच्या म्हणण्यानूसार या मशीनमुळे धान्यात काही गोंधळ होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com