Rain Impact Vegetable Prices Surge Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain: सर्वसामान्यांना मोठा झटका! भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ, पावसामुळे भाज्यांची आवक घटली

Rain Impact Vegetable Prices Surge: राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम भाजीपाल्यांवर झाला आहे. आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Priya More
  • मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली

  • नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली

  • पालेभाज्यांसह टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर वाढले

  • महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण

विकास मिरगणे, नवी मुंबई

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाल्याच्या बाजारालाही बसू लागला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी भाजी बाजारात विविध भाज्यांची आवक कमी झाल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजी खरेदी करताना ग्राहकांना प्रश्न पडत आहे की काय खरेदी कराचे. भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे.

सततच्या पावसामुळे शेतातून भाजीपाला काढणे आणि तो बाजारात पोहोचवणे कठीण झाले आहे. विशेषतः मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी या भाज्यांच्या किमतीत वाढ झाली असून ग्राहकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांतही भाजीपाल्याची आवक कमी राहण्याची शक्यता असून परिणामी दर आणखी वाढू शकतात.

तर दुसरीकडे, देशात देखील सगळीकडे महागाईची झळ बसत आहे. टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमतीत वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकाच्या साठवणुकीच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पावसाळ्यात कांदा आणि टोमॅटोच्या दरात हंगामानुसार चढ-उतार होते. एल निनोमुळे निर्माण झालेली तीव्र उष्णता आणि पावसाला झालेला विलंब यामुळे टोमॅटोच्या पिकावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळेच त्याचे दर वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील डीजेचा आवाज बंद करणारे विद्यानंद बापट कोण? ध्वनी प्रदूषणाविरोधात जनआंदोलन पेटलं!

Malai Sandwich Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट आणि क्रीमी मलाई सँडविच, वाचा सोपी रेसिपी

Water Intake: पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

सावधान ! तुमच्या चिप्समध्ये विष? एक्स्पायरी डेट बदलून चिप्सची विक्री

४ महिला, ३ ग्राहक अन् एक पंटर...; बंगल्यावर अचानक धाड पडली अन् सगळंच बिंग फुटलं

SCROLL FOR NEXT