Mumbai Rain: मुंबई- ठाणे, नवी मुंबईत मुसळधार, तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने

Mumbai Rain Local Train Updates: मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून या पावसाचा फटका लोकलसेवावर झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा १० त१ १५ मिनिटं उशिराने सुरू आहेत.

मुंबईमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम आता लोकल वाहतूक, रस्ते वाहतुकीवर होताना दिसत आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा उशिराने सुरू आहेत. ऐन गर्दीच्या वेळी पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला उशिर होणार असल्यामुळे लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते सीएसएमटी, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल या लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहेत. लोकल उशिराने धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल विलंबानं धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com