विद्यार्थांसाठी गुड न्यूज! अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर Saam Tv
मुंबई/पुणे

विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी काल (दि.27) जाहीर करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

पुणे – इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची (11th firts list released ) पहिली गुणवत्ता यादी काल (दि.27) जाहीर करण्यात आली. यात जवळपास 38 हजार 858 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. विद्यार्थ्यांचा ज्या महाविद्यालयात नंबर लागला आहे त्यांना ऑनलाइन पद्धतीने 30 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश निश्‍चित करावा लागणार आहे.

विज्ञान शाखेतून सर्वाधिक 19 हजार 153, वाणिज्य शाखेत 15 हजार 250, कला शाखेत 3 हजार 834 आणि व्होकेशनल अभ्यासक्रमात 621 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या 33 हजार 197 विद्यार्थ्यांना एलॉट जाहीर करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड मधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार अकरावीची पहिली प्रवेशक्रिया राबविण्यात येणार आहे.

शुक्रवारी (दि.२७) पहिली गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे कटऑफ गुण जाहीर झाले आहेत. सध्या पुणे विभागातून 311 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 11 हजार 205 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीतील 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते तर, त्यापैकी 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालयं ऍलॉट जाहीर झाले.

प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन

अकरावीची सर्व प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याचे काही कागदपत्रे अपलोड करायची राहिले असतील तर त्यांना त्याच्या लॉगीनमध्ये जाऊन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कॉलेज लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांना अपलोड केलेली कागदपत्रे पाहता येतील. त्यामुळे कागदपत्राचे कारण देऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गर्दी करू नये. तसेच “पेमेंट गेट वे’द्वारे शुल्क म्हणजेच डिजीटल स्वरुपात भरावे लागणार आहे.

नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

अकरावी प्रवेश निश्‍चित करताना ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र नाही, त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची प्रत अथवा पावती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत मिळणार आहे. या मुदतीत हे प्रमाणपत्र सादर केले गेले नाही, तर प्रवेश रद्द करण्यात येईल असे अकरावी प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

SCROLL FOR NEXT