Balasaheb Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त अभिवादन
Balasaheb Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त अभिवादन Saam TV
मुंबई/पुणे

Balasaheb Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त अभिवादन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. राज्याचे मुख्य़मंत्री आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे (Subhashchandra Bose, Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केलं आहे.

दरम्यान 'छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्त्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) केलं आहे.

तसंच, शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्त्व शब्दांत सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या, हिंदुत्त्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असही मुख्यमंत्री आपल्या ट्विटमध्ये म्हटंले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT