मुंबई: आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची 96 वी जयंती आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी आपल्या आजोबांच्या आठवणींना चांगलाच उजाळा दिला आहे. आदित्य यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो (photo) शेअर केला आहे. तो फोटो आपल्या बालपणीचा आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे हे क्रिकेट (Cricket) खेळताना दिसून येत आहेत. तर त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नातवाच्या पाठीमागे उभे आहेत. आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेला फोटो आज सोशल मीडियावर खूप वेगाने पसरत आहे. (balasaheb thackeray birth anniversary aaditya thackeray shares photo)
हे देखील पहा-
बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती असून, आज राज्यभरामध्ये शिवसैनिकांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर देखील आज फुलांची सजावट मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जयंतीनिमित्त आज रात्री ८ वाजेच्या सुमारास व्हिडिओ (Video) कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका (Elections) लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देणार आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी बाळासाहेबांचे चांगले संबंध होते. ते प्रत्येक पक्षाला हवेसे वाटत होते. जे नेते बाळासाहेबांना भेटू शकले नाही ते आज देखील हळहळ व्यक्त करत आहेत. हा करिष्मा होता बाळासाहेब ठाकरेंचा, बाळासाहेबांचे विचार हे शिवसेनेचे उर्जास्रोत आहे. असे राऊत यावेळी म्हणाले आहेत. तुम्ही आज जो काही संजय राऊत बघत आहेत. तो केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादामुळे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी मला एखाद्या मातीच्या गोळ्यापासून घडवले आहे. त्यांनी लहान वयात माझ्यावर शिवसेना आणि 'सामना'च्या संपादकपदासारख्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकले होते.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.