कुख्यात अनमोल बिश्नोईला भारतात आणलं
दिल्ली विमानतळावर एनआयएने त्याला ताब्यात घेतलं
सिद्धू मूसेवाला, सलमान खान आणि बाबा सिद्दीकी प्रकरणांत अनमोल बिश्र्नोईवर गंभीर आरोप
चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
भारताच्या सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. कुख्यात गँगस्टर आणि गुजरातच्या जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिश्र्नोईचा भाऊ अन्मोल बिश्र्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं आहे. त्याला अमेरिकेतून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणलं गेलं. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं.आज अनमोलला पाटियाला हाऊस कोर्टात आणलं जाणार आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांड, सिद्दू मुसेवाला हत्याकांड, सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात त्याच्यावर गंभीर आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल हा २०२२ साली बनावट पासपोर्टाच्या आधारे भारतातून पळाला होता. सुरुवातीला नेपाळ, दुबई, केनिया या देशातून पुढे अमेरिकेत गेला. काही वेळ अनमोल हा कॅनाडा येथे फिरत होता. कॅनडानंतर अमेरिकेत फिरणाऱ्या अनमोलला गृह सुरक्षा विभागाने ताब्यात घेतलं होतं. अनमोल हा अमेरिकेतील स्थानिक पोलिसांच्या ताब्यात होता.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाकडून २०० लोकांना भारतात आणलं जाणार आहे. त्यात अनमोल बिश्र्नोईचाही समावेश आहे. यात पंजाबच्या दोन कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. तर इतर १९७ लोक हे बेकायदेशीर प्रवासी आहेत. विमानळावर आल्यानंतर एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतलं. पटियाला हाऊस कोर्टात सादर केल्यानंतर एनआयए चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. त्याच्याविरोधात १८ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल लॉरे्न्स बिश्र्नोई हा परदेशातील मुख्य हँडलर होता. खंडणी, धमक्याची प्रकरण नियंत्रण करत होता. चौकशीत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे उघड होतील'.
अनमोल बिश्र्नोई भारतात अनेक मोठ्या प्रकरणात वाटेंड आहे. त्याच्याविरोधात सिद्धू मूसेवाला हत्याकांड, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, बाबा सिद्धिकी हत्याकांड प्रकरण यांसहित अनेक गंभीर गुन्ह्यात त्याचा हात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.