Breaking News: अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी Twitter/@ANI
मुंबई/पुणे

Breaking News: अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

काही दिवसांपुर्वी परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहीलं होतं त्यात ते म्हणाले होते अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही.

सुरज सावंत

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांनंतर त्यांची तब्बल तेरा तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना ईडी कडून अटक करण्यात आली होती. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर गेली अनेक दिवस देशमुख हे गायब झाले होते. सोबतच याच काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व ज्यांनी देशमुखांवर हे गंभीर आरोप केले ते, परमवीर सिंग हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत. काही दिवसांपुर्वी परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहीलं होतं त्यात ते म्हणाले होते अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही.

तब्बल तेरा तास चौकशी चालल्यानंतर ईडीकडून देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे येत्या काळात देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले होते. आजच देशमुख यांनी खुले पत्र लिहीत परमवीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे या पत्रात म्हटले होते. या पत्रातून त्यांनी सचिन वाझे व परमवीर सिंग यांना लक्ष्य केले होते. तसेच मी संविधान मानणारा भारताचा नागरिक असून ईडीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीला सामोरे जाऊन ईडीच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. तसेच हि चौकशी निष्पक्षपणे व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी या खुल्या पत्रात व्यक्त केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

SCROLL FOR NEXT