Mumbai Crime : मुंबईत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि तृतीयपंथींवर MIDC पोलिसांचा छापा chatgpt
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबईत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि तृतीयपंथींवर MIDC पोलिसांचा छापा

Crime News : अंधेरी पूर्व येथील MIDC पोलिसांच्या ATC पथकाने विशेष कारवाई करत सात बांगलादेशी तृतीयपंथींना अटक केली आहे. अवैधरीत्या भारतात प्रवेश करून मुंबईत वास्तव्यास असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

मुंबईत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंधेरी पूर्व येथील कारवाईत सात बांगलादेशी तृतीयपंथींना अटक करण्यात आली आहे. ते बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून मुंबईत वास्तव्यास असल्याचा प्राथमिक तपासात दावा करण्यात आला आहे.मुंबईत राहून सेक्स रॅकेट चालवत असल्याता संशय व्यक्त केला जात आहे.

अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलिसांच्या एटीसी (ATC) पथकाने अवैधरीत्या भारतात दाखल होऊन मुंबईत वास्तव्यास असलेल्या सात बांगलादेशी तृतीयपंथींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. हे सर्व आरोपी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून मुंबईत सेक्स रॅकेट चालवत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

एमआयडीसी पोलिसांना या तृतीयपंथींच्या टोळीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीसी पथकाने घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल परिसरात सलग दोन दिवस पाळत ठेवून सापळा रचला. त्यानंतर हॉटेलमधून सातही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मो. जिहाद मो. मोहम्मिल अली (२२), पिहू इस्लाम अशीर उद्दीन (२३), मो. हमीदूर मो. बेलाल रहमान (१८), मो. जाहेदुल हक मो. शुकूर अली (२३), मो. जॉनी बाबू मो. शाहिदूल इस्लाम (१८), आकी मो. नागरअली मोनी (२१) आणि मो. मुशरफ फैदुश खान (२२) यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये बांगलादेशी मोबाईल क्रमांक, मेसेंजरवरील संपर्क तसेच बांगलादेशाशी संबंधित विविध पुरावे आढळून आले. त्यावरून ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे व इतर पुरावेही जप्त केले आहेत.

या टोळीमार्फत मुंबईत आणखी मोठ्या संख्येने बांगलादेशी तृतीयपंथी अवैधरीत्या वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यादृष्टीने एमआयडीसी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे शहरातील अवैध घुसखोरी आणि संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्क येथे कॉक्रोज जनता पार्टीचे आज आंदोलन

Pitru Paksha: पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करावे की नाही?

आमदार मेहतांची मुजोरी संपेना, 'मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी'

भारतावर संसर्गजन्य कॅन्सरचं संकट, 23 लाख रुग्णांना व्हायरल कॅन्सर

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT